• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

चैतन्य चा तेरावा वर्धापनदिन

'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' या जांभुळपाडा स्थित वृध्दाश्रमाचा वर्धापनदिन ७ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. २०१२ साली यशवंत देवस्थळी आणि त्यांच्या पत्नी लीना देवस्थळी यांनी वृद्धांच्या देखभालीची वाढती समस्या विचारात घेऊन पुणे आणि मुंबई पासून समान अंतरावर असलेल्या जांभुळपाडा या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी हा वृध्दाश्रम उभारला आहे.

वृध्दाश्रमाबाबत सर्वसाधारणपणे आपण ज्या नकारात्मक गोष्टींचा विचार करतो त्याचा 'चैतन्य' मध्ये लवलेशही नाही. एखाद्या बैठ्या कौलारू मोठ्या वाड्यासारखी रचना, भरपूर उजेड, हवेशीर खोल्या, वृद्धांच्या राहण्याच्या गरजा ओळखून केलेली खोल्यांची रचना आणि अंतर्गत व्यवस्था, करमणुकीसाठी असलेला मनोरंजन कक्ष, एकावेळी जवळपास ३०-४० लोक सहज जेवायला बसू शकतील इतका प्रशस्त डायनिंग हॉल... असं 'चैतन्य' चं स्वरूप आहे. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि टापटीप याविषयी व्यवस्थापन काटेकोर आहे. इथलं जेवण चविष्ट आणि घरगुती आहे. इथले सर्वच कर्मचारी निवासींची अतिशय मनापासून काळजी घेतात. आणि या सर्व सुविधा सर्वसाधारण मध्यम वर्गाला परवडेल अशा रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रवेशद्वारावर 'चैतन्य' मधील निवासी श्री भास्कर सामंत यांनी सुवाच्य अक्षरात लिहिलेला वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा गोषवारा....

प्रवेशद्वारावरील सुबक रांगोळी...

रंगमंचावरील सुंदर सजावट...

डावीकडे 'चैतन्य' च्या आर्किटेक्ट नीरा आडारकर आणि उजवीकडे वर्धापन दिनाच्या प्रमुख पाहुण्या मुंबई उच्च न्यायालयाच्या भूतपूर्व न्यायाधीश मृदुला भाटकर...

माननीय मृदुला भाटकर दीप प्रज्वलन करताना...

'चैतन्य' चे विश्वस्त शैलेश राजाध्यक्ष दीप प्रज्वलन करताना...

'चैतन्य' चे खंदे पाठीराखे आणि मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ वीरेंद्र तुळजापूरकर दीप प्रज्वलन करताना...

निवासींच्या वतीने अरविंद कुलकर्णी दीप प्रज्वलन करताना...

'चैतन्य' च्या व्यवस्थापिका अपर्णा जोशी दीप प्रज्वलन करताना...

कर्मचाऱ्यांच्या वतीने दीप प्रज्वलन करताना ईशा सोगम....

प्रत्येक वर्धापन दिनी 'चैतन्य' मधील कर्मचारी उत्साहात प्रार्थना गीत/ स्वागत गीत सादर करतात... याही वर्षी त्यांनी ते केले आणि उपस्थितांकडून वाहवा मिळवली.

'चैतन्य' मधील आपल्या अनुभवांबद्दल बोलताना येथील सुरक्षारक्षक कर्मचारी चंद्रकांत धावडे...

निवासींच्या वतीने इथे राहण्याचे आपले अनुभव उत्स्फूर्तपणे सांगताना भास्कर सामंत...

विश्वस्तांच्या वतीने 'चैतन्य' मध्ये गेल्या वर्षी झालेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना विश्वस्त शिरीष घोगे...

यानंतर अपर्णा संत यांचा लता मंगेशकर आणि मदनमोहन यांच्या अजरामर गाण्यांवर आधारित 'यादावरी' हा सुंदर आणि सुरेल कार्यक्रम झाला. तबला साथ डॉ राजेंद्र दूरकर... ऱ्हिदम आर्टिस्ट विशाल गंड्रतवार, हार्मोनियम साथ प्रसन्न बाम आणि सह गायिका रेश्मा कापशीकर आणि चिन्मयी तांबे....

अपर्णा संत

कीबोर्ड वर सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक आणि संगीत संयोजक केदार परांजपे...

गाण्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना माननीय मृदुला भाटकर आणि नीरा आडारकर....

'चैतन्य' शी सुरवातीपासूनच जिव्हाळ्याचे नाते असलेले स्थापत्य अभियंता श्री व सौ विवेक गाडगीळ यांच्या सह विश्वस्त शिरीष घोगे आणि शैलेश राजाध्यक्ष....

डावीकडून-'चैतन्य' च्या संस्थापक विश्वस्त लीना देवस्थळी आणि आणखी एक विश्वस्त प्रिया देवस्थळी...

गाण्याच्या कार्यक्रमानंतर कलाकारांचा सत्कार करताना शैलेश राजाध्यक्ष...

आभार प्रदर्शन करताना संस्थापक विश्वस्त लीना देवस्थळी

सरतेशेवटी संस्थापक विश्वस्त लीना देवस्थळी यांनी आभार व्यक्त केले. सुग्रास आणि रूचकर जेवणाचा आस्वाद घेत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.